पंडितांचे काश्‍मीरात पुनर्वसन करा!

वॉशिंग्टन: काश्‍मीरातील विस्थपित काश्‍मीरी पंडितांचे जम्मू काश्‍मीर या केंद्रशासित प्रदेशात त्वरीत पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी काश्‍मीरवासियांच्या अमेरिकेतील संघटनेने केली आहे.

काश्‍मीरी ओव्हरसिज असोशिएशन असे त्यांच्या संघटनेचे नाव आहे. त्यांनी म्हटले आहे की भारत सरकारने काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला असून त्यांनी 35 ए कलमही रद्द केले आहे. त्यामुळे काश्‍मीरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या आशा पुन्हा निर्माण झाल्या आहेत.

भारत सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे आता त्यांनी काश्‍मीरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या कामाकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील काश्‍मीरी पंडितांच्या संघटनेची एक दिवसाची परिषद वॉशिंग्टनच्या उपनगरात गेल्या शनिवारी आयोजीत करण्यात आली होती. त्यात हीं मागणी करण्यात आली. त्यात कलम 370 रद्द करण्यात आल्याच्या संबंधात चर्चा झाली. काश्‍मीरी पंडितांना तेथे पुर्ण सुरक्षेची हमी दिली गेली पाहिजे अशी अपेक्षाहीं त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.