रोग, तणावमुक्‍तीकरिता नियमित योग हवा : डॉ. मुथा

नगर -योगा हे मनुष्याचा बाह्य व आंतरिक विकास घडवून आणण्याचे सर्वांगीण साधन वा माध्यम आहे योग हा सातत्याने करायला हवा नियमित योगाने विविध आजार तर बरे होतात उंची, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते अष्टांग योगाने मन प्रसन्न, चेहऱ्यावर तेज, स्वास्थ, सकारात्मकता येते जीवन निरोगी व सुदढ राहण्यास मदतच होते सूर्यनमस्कारात सर्व आसनाचा समावेश असल्याने हे आसने सर्वानी नियमित करावीत रोग मुक्त, तणावमुक्त, राहण्यासाठी समुद्धी व शांतता आणण्यासाठी सकाळी व संध्याकाळी एक तास योगासाठी देणे आवश्‍यक आहे.

असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हींगचे योगशिक्षक डॉ. अभय मुथा यांनी केले. लालटाकी रस्त्यावरील महाराष्ट बालक मंदिर शाळेत डॉ. अभय मुथा यांनी जागतिक योग दिनानिमित्त मुलांकरिता योग व प्राणायमाची आसने घेतली या कार्यक्रमास मुख्याध्यापक सुरेश शेवाळे आदी उपस्थित होते. यावेळी ताडासन, अर्धकटीचंद्रासन, वृक्षासन, हस्तपादासन, त्रिकोणासन, पश्‍चिमोत्तासन, पर्वतासन, भुजंगासन, योगमुद्रा, धनुरासन, पवनमुक्तासन, ओमकार साधना, भ्रामरी प्राणायम, आदी आसने व प्राणायाम घेतले त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला जान्हवी घोडके हिने योग प्रात्यक्षिके करून दाखविले प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश शेवाळे यांनी केले.सुत्रसंचालन दीपक इरोळे यांनी केले आभार स्मिता म्हस्के यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.