राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरपार पडली. या बैठकीनंतर पुन्हा चार वाजता चर्चा करणार असून, त्यानंतर जनतेसमोर भूमिका मांडणार असल्याची माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
वर्षा बंगल्यावर [पार पडलेल्या या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन उपस्थित होते.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ”माननीय राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसाठी भाजपाला निमंत्रित केले आहे.
या निमंत्रणाबाबत पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आता संध्याकाळी चार वाजता आम्ही पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. त्यानंतर सरकार स्थापन करणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय आम्ही राज्यपालांना कळवणार आहोत,”