‘तुला पाहते…’ मध्ये वडीलांचा ईशाला घरात घेण्यास नकार

ईशाच्या वडिलांना रुपालीकडून ईशाच्या प्रेग्नन्सीच्या रिपोर्टबाबत समजते. ही बातमी रुपालीच्या आईला समजते आणि त्या ईशाच्या आईवडिलांचे अभिनंदन करायला जाते. त्यांना ही बाब माहितीच नसते. ईशाने ही बाब आपल्यापासून लपवून ठेवली याचे तिच्या वडिलांना खूप दुःख होते. ते कोणालाही न सांगता आपल्या घरी निघून येतात.

दरम्यान ईशाच्या धोकदायक योजनेवरून जयदीप आणि सोनियामध्ये भांडण होते. ईशा आपल्या आई बाबांना भेटायला घरी जाते. पण तिचे वडील तिला घरातच घेत नाहीत. जर राजनंदिनी म्हणून या घरात येणार असशील तर परत जा, असे ते तिला सांगतात. आपली मुलगी ईशा असली तरच ते तिला घरात घ्यायला तयार असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.