मुंबई – बाॅलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर हे प्रकृती ठिक नसल्यामुळे अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू सिंग कपूर ही देखील आहे. स्वत: ऋषी कपूर यांनी मागील महिन्यात 29 सप्टेंबर रोजी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. तसेच त्यावरील उपचारासाठी मी अमेरिकेला जात आहे असे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी ऋषी कपूर हे कॅन्सरने ग्रस्त असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुंटूबियांनी पुढे येत ऋषी कपूर हे तब्येत ठिक नसल्यामुळे अमेरिकेतील न्युयाॅर्कमध्ये उपचार घेत असल्याची माहिती दिली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ऋषी कपूर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून लवकरच मुंबईत येण्याची शक्यता आहे. तसेच ते आगामी चित्रपटाचा शुटींग सुरु करणार आहे. ऋषी कपूर यांनी ट्विट केले आहे की, ‘माझी प्रकृती सुधारण्यामध्ये माझ्या कुटूंबाचा तसेच मित्र परिवाराचा प्रेमाचा फार मोठा वाटा आहे.”