नवी दिल्ली – ग्लेनमार्क औषध निर्माता कंपनीने करोना आजारावरील औषधाचे दर 27 टक्क्यांनी कमी करून ते 75 रुपये प्रति टॅबलेट केले आहेत.
कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना लाभ होणार आहे. गेल्या महिन्यात कंपनीने हे औषध बाजारात आणले होते त्यावेळी औषधाचे दर 103 रुपये प्रति टॅबलेट होते. मात्र, आता किंमत कमी करण्यात आली असल्याचे कंपनीने शेअरबाजारांना कळविले आहे. या औषधासाठीचा कच्चा माल स्थानिक पातळीवर उपलब्ध करण्यात येत आहे. त्याचबरोबर उत्पादन वाढल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे हे दर कमी करता येणे शक्य झाले असे कंपनीने म्हटले आहे.
आगामी काळातही ही कंपनी या आजारावर औषध उपलब्ध करून ते किफायतशीर दरावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. लस मिळत नाही तोपर्यंत या औषधांची मागणी वाढणार आहे.