चिनी लसीची परिणामकारकता कमी; चीन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बीजिंग  – करोनाच्या विषाणू प्रतिबंधासाठी चीनमध्ये विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्‍स या लसीची परिणामकारकता कमी असल्याचे चीनमधील रोग नियंत्रण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या लसीची परिणामकारकता वाढवण्यासाठी या लसीमध्ये अन्य लसीचे काही प्रमाण मिसळण्याबाबत सरकार विचार करत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

चिनी लसीमध्ये संरक्षण तत्वांचा अभाव आहे, असे “चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’चे संचालक गाओ फू यांनी शनिवारी चेंगडू शहरांमध्ये एका कॉनफरन्स मध्ये सांगितले. चीनने या लसीचे लक्षावधी डोस परदेशी निर्यात केले आहेत. तर फायझर बायोटेक लसीबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न नाही केला आहे. यालसीच्या चाचणी संदर्भात आरएनए किंवा एमारएनए प्रक्रियेबाबत संग्राम निर्माण करू अविश्वासाचे वातावरण केले जात आहे. मात्र आता वेगळ्या तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या वेगळ्या लसीचा वापर करण्याबाबत औपचारिक विचार केला जात आहे असे गाओ म्हणले.

मात्र गाओ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत चिनी अधिकाऱ्यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या अन्य अधिकाऱ्यांनी एमआरएनए आधारित लसीच्या संशोधनावर काम सुरू केल्याचे सांगितले.

चीनमध्ये एमआरएनए आधारित लस विकसित केली जात आहे आणि त्याची वैद्यकीय चाचणी सुरू असल्याचे अन्य अधिकारी वॅंग हॉकिंग यांनी सांगितले. मात्र त्यांनी या लसीच्या संभाव्य उपलब्धतेबाबत कोणतीही कालमर्यादा स्पष्ट केली नाही.

चिनी लसीची परिणामकारकता वाढवण्यासाठी दोन वेगळ्या लसीचे मिश्रण करण्याचा पर्यायही पुढे आला आहे. त्यासाठी फायझर बायोटेक आणि ऍस्ट्राझेन्काच्या लसीचा अभ्यास केला जात आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेल्या सायनोव्हॅक आणि सायनोफार्म या लसी मिक्‍सिको, तुर्की, इंडोनेशिया, हंगेरी, ब्राझील आदी 22 देशांमध्ये निर्यात करण्यात आल्या आहेत.

संसर्गाची लक्षणे नियंत्रित करण्याबाबत सायनोव्हॅक लसीची परिणामकारकता 50.4 इतकी आहे. तर फायझर बायोटेक लसीची परिणामकारकता 97 टक्के आहे. लसीला मंजुरी देण्याची प्रक्रिया किचकट असल्याने चिनी लस अमेरिका पश्‍चिम युरोप आणि जपानमध्ये विकली जाण्याची शक्‍यता फार कमी आहे. चीनमध्ये अद्याप कोणत्याही विदेशी लसीला परवानगी दिली गेलेली नाही एमआरएनए तंत्रज्ञानाने विकसित केलेली लस मानवासाठी योग्य आहे. त्यामुळे अगोदरच उपलब्ध असलेल्या अन्य लसींकडे दुर्लक्ष करता कामा नये असे गाओ यांनी म्हटले आहे. गाओ यांनीच पूर्वी एमआरएनए तंत्रज्ञानाच्या लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी, आरोग्य आणि विज्ञान विषयक तज्ञांनीही फायझर बायोटेक लसीवर संशय व्यक्त केला होता.
आतापर्यंत चीनमधील 3 कोटी 40 लाख नागरिकांनी चिनी लसीचे दोन घेतले आहेत तर 6 कोटी 50 लाख लोकांनी एक डोस घेतला आहे…

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.