वीजेवरील वाहनांचा जीएसटी कमी करणार

नवी दिल्ली – वीजेवर चालणाऱ्या वाहनांवरील कर कमी करण्याच्या प्रस्तावावर जीएसटी कौन्सिल मध्ये विचार केला जाईल अशी माहिती अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत दिली. या संबंधात भाजपचेच वरूण गांधी यांनी प्रश्‍न विचारला होता. ठाकूर म्हणाले की हा विषय आधीच जीएसटी कौन्सिलपुढे मांडण्यात आला आहे त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

वीजेच्या वाहनांचा वापर वाढला तर देशातील प्रदुषणाच्या समस्येवर परिणामककारक उपाययोजना होऊ शकते असे त्यांनी नमूद केले. जीएसटी करप्रणालीचे त्यांनी जोरदार समर्थनही यावेळी केले ते म्हणाले की देशात कर भरणारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोकांचा या कर प्रणालीवरील विश्‍वास वाढला आहे. गेल्या महिन्यात एकाच दिवशी 21 लाख कर विवरण पत्रे दाखल झाल्याचे उदाहरणही त्यांनी दिले. ही कर प्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत करण्यास प्राधान्य दिले जात आहे असेही ठाकूर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.