कोलकाता – भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू यांच्या विवाहाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ८० च्या दशकात त्यांनी क्रिकेट संघाला अनेकदा यश मिळवून दिले आहे. त्यानंतर त्यांनी समालोचन सुरु केले. २०१६ला कर्करोगातून बरे झाल्यानंतर त्यांनी बंगाल क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक म्हणून काम पहिले आहे. आता ते पुन्हा एकदा चर्चेत येण्याचा विषय आहे तो त्यांचा विविह. आपल्या वयापेक्षा २८ वर्ष लहान असलेल्या बुलबुलशी ते लग्न करणार आहेत.
त्यांचा हा दुसरा विवाह आहे. पहिली पत्नी हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरच ते आता बुलबुलला आपले जीवनसाथी बनविणार आहेत. येत्या २ मे रोजी बुलबुल साहा यांच्याशी कोलकाता येथे विवाह करणार आहेत.अरुण लाल आणि बुलबुल एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. दोघांची मैत्री अनेक वर्षांपासून आहे. लाल यांनी लग्नाची पत्रिका छापली असून आमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. लाल यांच्या विवाहाला क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे सर्व अधिकारी, त्यांचे सहकारी क्रिकेटपटू आणि मित्रांना आमंत्रित केले जाणार आहे.
अरुण लाल यांची कामगिरी
अरुण लाल यांचा जन्म १ ऑगस्ट १९५५ रोजी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे झाला. ते बंगालकडून क्रिकेट खेळत होते. भारताकडून त्यांनी १६ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत ७२९ तर एकदिवसीय सामन्यात ११२ धावा केल्यात. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये त्यांना एकही शतक करता आले नाही. प्रथम श्रेणीतील १५६ सामन्यात ३० शतक आणि १० हजार ४२१ धावा केल्या. २७ जानेवारी १९८२ रोजी त्यांनी कटक येथे इंग्लंडविरुद्ध पहिली मॅच खेळली होती. तर एप्रिल १९८९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरची कसोटी खेळली.