पुणे – गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात असताना, हवामान विभागातर्फे पुण्यातील घाटमाथा परिसरासाठी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
देशाच्या पूर्व किनारपट्टीवर गुलाब’ वादळ धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी होणार असली, तरी ते विदर्भापर्यंत पुढे येईल. तसेच त्याचा प्रभाव पुढे कोकणापर्यंत जाणवणार असल्याचे हवामान
विभागाने सांगितले आहे. त्यामुळे पुणे शहरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, पावसाच्या हलक्या सरी पडतील.
मात्र, शहराच्या परिसरातील घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता आहे. तेथे रेड अलर्ट’ दिला आहे. मंगळवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाजही विभागाने वर्तविला आहे.