जिल्हा परिषदेअंतर्गत सरळसेवेची रिक्त पदांसाठी लवकरच भरती

पुणे – जिल्हा परिषदेअंतर्गत सरळसेवेची रिक्त पदे भरण्यात येणार असून, राज्य शासनाच्या ग्रामविभागाकडून येत्या 26 मार्च 2019 पासून या भरती प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामध्ये गट- क संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) 584 पदे आणि अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 11 पदे असे एकूण 595 पदांची भरती करण्यात येणार असून, जिल्ह्यातील तरूणांसाठी ही सुवर्ण संधी आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार असून, त्यामध्ये आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पशुधन पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) आणि (लेखा) कनिष्ठ लेखाधिकारी ही अनुसूचित क्षेत्राबाहेरील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. तर अनुसूचित क्षेत्रातील आरोग्य सेवक आणि सेविका पदे भरण्यात येणार आहे. अनुसूचित क्षेत्रातील संवर्गनिहाय पदे ही शासन अधिसूनेनुसार जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी राखीव असून, स्थानिक उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी www.mahapariksha.gov.in या संकेतस्थाळावर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून, पदभरतीबाबतची जाहिरात येत्या 6 मार्चपासून www.mahapariksha.gov.in आणि www.punezp.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानंतर 26 मार्च ते 16 एप्रिल 2019 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

जिल्हा परिषदे अंतर्गत पुढील रिक्त पदे भरण्यात येणार आहे : अनुसूचित क्षेत्रातील (बिगर पेसा) : आरोग्य सेविका – 272, सेवक (पुरूष) – 61 आरोग्य सेवक (पुरूष, हंगामी फवारणी कर्मचारी) – 112, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 15, कंत्राटी ग्रामसेवक – 15, औषध निर्माता – 16, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 3, विस्तार अधिकारी (कृषी) – 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 51, पशुधन पर्यवेक्षक – 4, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) – 13, पर्यवेक्षिका (नामनिर्देशनाने) – 5, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) – 10, कनिष्ठ लेखाधिकारी 4. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) : आरोग्य सेवक (पुरूष, हंगामी फवारणी कर्मचारी) 1 आणि आरोग्य सेविका 10.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)