पुणे – रिलेशन आर्मी भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा पेपर परीक्षेच्या एक दिवस आधी मिळण्यासाठी ऍकॅडमी चालक आरोपींनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाच लाख रुपये घेतल्याची बाब पुढे आली आहे. या गुन्ह्यात अटक चार आरोपींच्या राज्यात विविध ठिकाणी ऍकॅडमी आहेत.
या गुन्ह्यात वसंत किलारी (45, रा. दिल्ली, मूळ आंध्रप्रदेश), थिरू थंगवेलू (47, रा. वेलिंग्टन, तमिळनाडू) आणि भारत अडकमोळ (37 , रा. नगरदेवळा, जळगाव) यांच्या कोठडीत दि. 5 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
तर महेंद्र सोनावणे (37 , रा. अहमदनगर), अलीअख्तर खान (47), आजाद खान (37 दोघेही रा.उत्तरप्रदेश) आणि किशोर महादेव गिरी (40 रा. बारामती) यांनादेखील या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे.
किलारी, थंगवेलू आणि अडकमोळ यांनी त्यांच्याकडून पेपर देण्यासाठी एक लाख रुपये घेतले. किलारी आणि थंगवेलू हे मेजर दर्जाचे अधिकारी आहेत. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी केली.