तीन बोटे गमावलेल्या कामगाराची कंपनी व्यवस्थापनाकडून बोळवण

पोलिसांत तक्रार : रुग्णालयाचा देखील एकाच दिवसाचा खर्च केला

पिंपरी – भोसरी औद्योगिक वसाहतीतील टालब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनंटस्‌ लि. या कंपनीत 16 फेब्रुवारीला झालेल्या अपघातात हाताची तीन बोटे गमावलेल्या कंत्राटी कामगारावर किरकोळ उपचार करुन कंपनी व्यवस्थापनाने बोळवण केली आहे. आयुष्यभरासाठी तीन बोटे गमावून बसलेल्या या कामगाराचा उपचाराचा पूर्ण खर्च देखील कंपनीने दिला नाही.

याविरोधात या कामगाराने याबाबतची रितसर तक्रार कामगार उपायुक्त पुणे विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे व पोलिसांकडे दिली आहे. याबाबत पोलिसांनी कंपनीतील संबंधितांवर कलम 287 व 338 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 16 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास प्रेस मशीन वर काम करताना राजरत्न होसाळेकर या तरूण कंत्राटी कामगाराला दोन हाताची एकूण तीन बोटे गमावावी लागली आहेत.

मूळचा कर्नाटक येथील बिदर जिल्ह्यातील राजरत्न हा 26 वर्षा चा आहे व गेल्या तीन महिन्यांपूर्वी हेल्पर या पदावर कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. एकतर आधीच घरची गरिबी व एप्रिल महिन्यातच बहिणीचे लग्न असल्याने पैसे जमविण्याच्या उद्देशाने तो या कंपनीत कामाला लागला होता.

हा अपघात झाल्यावर कंपनीतील लोकांनी त्याला चिंचवड, संभाजीनगर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारांकरिता दाखल केले. सर्जरी करून हात ठीक होईल असे सांगितले मात्र उपचारादरम्यान त्याला इंजेक्‍शन देऊन त्याची तीन जखमी बोटे काढून टाकण्यात आली व लगेच 24 तासातच त्याला रुग्णालयातून जायला सांगितले. यावर त्याने बरे वाटत नाही असे सांगितले. तेव्हा तेथील डॉक्‍टरांनी त्याला सांगितले की, तुझ्या कंपनीने एकाच दिवसाचा खर्च देऊ असे सांगितले आहे व पुढील पैसे तुला द्यावे लागतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.