पुणे – जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, रुग्णालयांसाठी आता वैद्यकीय अधिकाऱ्यासंह फिजिशियन, भूलतज्ज्ञांसह विविध पदांच्या 1 हजार 521 जणांची पदभरती करण्यात येणार आहे. ही भरती पुढील तीन महिन्यांसाठी असेल.
ग्रामीण किंवा नगरपालिका हद्दीतील व्यक्ती अहवाल पॉझिटिव्ह येताच पुण्याकडे उपचारासाठी येतात. परिणामी खाटांची कमतरता, अपुरे मनुष्यबळ असल्याने साथ नियंत्रण करताना पायाभूत सुविधा उभारताना आरोग्य यंत्रणेची पुरती दमछाक होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड आरोग्य केंद्रे, समर्पित कोविड रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य सोसायटीच्यामार्फत जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरसाठी फिजिशियन, भूलतज्ज्ञ, एमबीबीएस, बीएएमएस पदवी घेतलेले वैद्यकीय अधिकारी, नर्स, क्ष किरण तंत्रज्ञ, इसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, डाटा एंट्री ऑपरेटर, हॉस्पिटल मॅनेजर या पदांची भरती होणार आहे.
एमबीबीएस-239 तर बीएएमएस-263 वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पद भरती होणार आहे. तसेच बीडीएस-35 पदवीधारकांनाही संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी http://punezp.mkcl.org/ या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.