“आरआरआर’मध्ये नवीन कलाकारांची भरती

आलिया भट आणि अजय देवगण”आरआरआर’मधून तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांच्या या सिनेमामध्ये आता आणखी काही नवीन कलाकारांची भरती झाली आहे. 1920 च्या सुमारासचे कथानक असलेल्या या सिनेमामध्ये ओलिव्हाया मोरिस, रे स्टिव्हनसन आणि एलिसन डुडी ही मंडळीही असणार आहेत.

याशिवाय एन.टी.रामाराव ज्युनिअर, राम चरण हे देखील लीड रोलमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी अर्थातच राजामौली यांच्याकडे आहे. हा सिनेमा पुढच्यावर्षी 20 जुलैला 10 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचे 70 टक्के शुटिंग यापूर्वीच झाले आहे.

अलुरी सितारामा राजू आणि कोमारू भीम या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर या सिनेमाचे कथानक आधारलेले आहे. राजामौली यांच्या “मख्खी’साठी अजय देवगण आणि काजोलने त्यांच्याबरोबर कथेच्या निवेदनाचे काम केले आहे.

कदाचित आलियासाठी त्यांच्याबरोबरचा अनुभव पहिलाच असेल. अजय देवगण सध्या “तानाजी : द अनसंग वॉरिअर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. “तानाजी’ ओय्ड्‌गच्ता वर्षी 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. आलिया यापूर्वी “कलंक’मध्ये दिसली होती. शाहरुख आणि रणबीरबरोबरही ती लीड रोलमध्ये असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.