संदीप राक्षे
सातारा – साताऱ्यात सक्शन गाडीच्या फेऱ्यांचे नक्की सक्शन कसे होते ? या विषयी कागदोपत्री नोंदीच नसल्याने गाडीचा महसूल जिरतोय कोठे ? हे शोधण्याची वेळ आली आहे.आरोग्य विभागाचे नक्की चालले काय ? हे विचारण्याची वेळ आली आहे.
सत्ताधारी सातारा विकास आघाडीची साताऱ्यात सत्ता येऊन तब्बल अडीच वर्ष झाली. मात्र सातारकरांना ज्या नागरी सुविधा मिळायला हव्यात त्याची सुद्धा वणवण सुरू आहे. परिवहन व आरोग्य विभागाच्या सहकार्याने साताऱ्यात मल: निस्सारण वाहनाची सेवा दिली जाते. पालिका हद्दीत पाचशे रुपये व हद्दीच्या बाहेर दीड हजार अशा ठोकळ रकमांचे नियोजन असते. या रकमांच्या तरतुदींचे उल्लेख नगरपालिका अधिनियमात नाही. तरीसुद्धा गाडीच्या फेऱ्या व मिळणारा महसूल यांचा हिशोब जुळत नसल्याची चर्चा सुरु असून आरोग्य विभागाचेच आरोग्य बिघडल्याची गुपचूप खसखस पिकू लागली आहे.
सक्शनचा खेळ रोगापेक्षा इलाज भयंकर
साताऱ्यात सक्शन गाडीची दुरुस्ती म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर आहे. काही वर्षापूर्वी सक्शन पंपच बिघडल्याने गाडी बरीच वर्ष उभी होती. सक्शन गाडीला तब्बल चौदा वर्ष झाली. मात्र गाडीच्या तांत्रिक दुरूस्तीने पालिका घाईला आली. हायड्रॉलिक सक्शन व इतर दुरूस्तीच्या नावाखाली तीस लाखापेक्षा जास्त बिले निघाल्याचा अनुभव आहे. आजही गाडीची सक्शन यंत्रणा दुरूस्त असली तरी मलनिस्सारण पुरेशा क्षमतेने होत नाही. त्यामुळे अद्ययावत सक्शन यंत्रणेचा साताऱ्यात आजपण अभावं आहे.
नगरसेवकांची दादागिरी व मॅनेज अधिकारी
आरोग्य विभागात अधिकारी इतके तयारीचे की बारनिशी-परिवहन विभाग -आरोग्य निरीक्षक व्हाया सभापती असा येणारा सक्शनचा मागणी अर्ज मधेच गायब होत असे. मधल्या काळात सदर बझारच्या एका नगरसेवकाने पालिकेची गाडी बंद ठेवून स्वतःच्या खाजगी सकशन गाडीचा खुलेआम धंदा मांडून सातारकरांच्या खिशाला चाट दिली होती. आता सुध्दा सक्शन गाडी फारशी रस्त्यावर दिसत नाही मात्र तरीसुध्दा देखभाल दुरुस्तीचे प्रस्ताव थांबले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गोंदवले : वाढत्या उन्हामुळे नागरिक घराबाहेरही पडत नाही. मात्र, हातावर पोट असल्याने आणि शेतीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने गोंदवले येथील बाजारपेठेत शेतकरी रखरखत्या उन्हात छत्री, घमेलेचा सावलीसाठी आधार घेऊन पोटासाठी मंडई विकत आहेत.