महापालिकेकडून वसुली मोहीम कडक

शहरात 41 थकबाकीदारांचे नळ कनेक्‍शन तोडले

नगर  – मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीवरून महापालिकेच्या सभेत वसुली विभागाचे वाभाडे काढल्यानंतर प्रशासनाकडून थकबाकीच्या वसुलीसाठी कडक पावले उचलली जात असून आज पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या 41 जणांचे नळ कनेक्‍शन अक्षरशः तोडून टाकले आहे.

या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी बुरुडगाव प्रभाग समितीच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. सोमवारी प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी तब्बल 33 थकबाकीदारांचे नळ कनेक्‍शन तोडून पाणी बंद केले आहे.

दरम्यान, आठ अनधिकृत नळजोडही मनपाकडून बंद करण्यात आले असून, या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. महापालिकेची कराची थकबाकी 201 कोटींवर पोहचली आहे. मागील तीन महिन्यांत 65 टक्के करदात्यांनी महापालिकेत रांगा लावून 21 कोटी 59 लाख कर जमा केला. मात्र, अद्यापही 35 टक्के थकबाकीदारांकडे 201 कोटी रुपये थकीत आहेत. प्रभाग अधिकारी गोसावी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोलापूर रोडवरील यशवंत कॉलनी परिसरातील 33 मालमत्ताधारकांकडे असलेल्या 11 लाख 89 हजार 370 रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांचे नळ कनेक्‍शन तोडले आहे. तर याच परिसरातील 8 अनधिकृत नळ कनेक्‍शनवरही पथकाने कारवाई करुन ते बंद केले आहेत

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)