अस्वच्छता करणाऱ्यांकडून 1 लाख दंड वसूल

कोथरुड – रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघूशंकेस व शौचास बसणे, कचरा वर्गीकरण न करणे, पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक वापरणे, सोसायट्यांमधील बंद पडलेले गांडूळखत प्रकल्प कार्यान्वित न करणे, पिण्याच्या पाण्याचा नको त्या ठिकाणी वापर करणे, राडारोडा टाकणे, कचरा जाळणे अशा अनेक कारणांमुळे अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने गांधीगिरीतून मे महिन्यात तब्बल 1 लाख 7 हजार 350 रुपये दंड वसूल केला आहे.

कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालय आरोग्य खात्यातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी, मोकादम व सफाई कामगार आपापल्या हद्दीतील सोसायट्या, व्यवसाय परिसरातील नागरिक, व्यापारी, पथारीवाले, हातगाडीवर भाजी व फळे विक्रेते, भाजीवाले, पानटपरी, हॉटेल व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या नागरिकांच्या ठिकाणी जाऊन स्वच्छतेविषयी जनजागृती करत आहेत.

जनजागृतीपर कार्यक्रमाबरोबरच दंडात्मक कारवाई देखील रोज करण्यात येत आहे. ही प्रबोधन व दंडात्मक कारवाई प्रभाग क्रमांक 10, 11 व 12 या तीनही प्रभागांत सुरू आहे. हा जनजागृतीपर अभिनव उपक्रम आणि दंडात्मक कारवाई ज्ञानेश्‍वर मोळक यांच्या आदेशानुसार व सहायक महापालिका आयुक्‍त शिशीर बहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्त्वाखाली राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य निरीक्षक शिवाजी गायकवाड, सचिन लोहकरे, महेश लकारे, संतोष ताटकर, नवनाथ मोकाशी, सतीश बनसोडे, वैभव घटकांबळे, गणेश साठे, प्रमोद चव्हाण व मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे, लक्ष्मण सोनवणे, साईनाथ तेलंगी, अशोक खुडे, गजानन कांबळे, सुनील भोसले, संजय कांबळे व सेवक कुणाल जाधव, दत्ता जाधव, परेश कुचेकर, चंद्रकांत धोत्रे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.