सुपरस्टार यशच्या आगामी “केजीएफ चॅप्टर-2’ची चाहते अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा जाहीर करण्यात आली. परंतु करोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली.
आता चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउस होम्बले फिल्म्सने घोषणा केली आहे की, त्यांनी “केजीएफ चॅप्टर-2’चे प्रदर्शन करण्यासाठी दक्षिणेतील झी चॅनलसोबत करार केला आहे. “केजीएफ चॅप्टर-2’चे साउथ सेटलाइट राइट्स हे झी कन्नड, झी तेलुगु, जीतमिल आणि झी मलयालम यांना विक्रमी किंमतीत देण्यात आले आहे.
यासंदर्भात निर्माता विजय किरागंदूर म्हणाले, आम्हाली ही घोषणा करताना आनंद होत आहे की आम्ही दक्षिणी भाषांमधील “केजीएफ चॅप्टर-2’च्या सेटलाइट राइट्ससाठी “झी’सोबत करार केला आहे. “झी’च्या सहकार्याने आम्ही जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यत पोहचण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
“केजीएफ चॅप्टर-2′ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सुपरहिट असल्याचे मानले जात आहे. कारण या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती. आता दुस-या भागात यशशिवाय संजय दत्त, रवीना टंडन,
श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. यात संजय दत्तने अधीरा नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगु, मलयालम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे.