सर्वाधिक लोकप्रिय जोडींपैकी एक अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकतीच सोशल मीडियावर आई-बाबा होणार असल्याची सर्वांना गुड न्यूज दिली आहे. ही गुड न्यूज सोशल मीडियावर काही क्षणांतच जगभर पसरली. या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी आणि मित्र परिवारांकडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
विरुष्काच्या या गुड न्यूज घोषणेच्या पोस्टला केवळ 24 तासांतच इंस्टाग्रामवर तब्बल 15.3 मिलियन लाइक्स मिळाल्या आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावरील सर्वात कमी वेळात सर्वाधिक लाइक्स मिळविणारी पोस्ट ठरली आहे.
यापूर्वी सुपर मॉडल गिगी हदीद आणि जैन मलिक यांनी आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वी केलेल्या फोटोशूटला सोशल मीडियावर सुमारे 8.2 मिलियन लाइक्स मिळाल्या होत्या. तसेच जस्टिन बीबर आणि हॅली बाल्डविन यांच्या साखरपुड्याच्या फोटोला 13.4 मिलियन, तर अभिनेता ड्वेन जॉनसन याच्या लग्नाच्या फोटोला 14.6 मिलियन लाइक्स मिळाल्या होत्या.
विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर सर्वाधिक आवडणाऱ्या सेलिबिटी जोडीपैकी एक आहे. फक्त बॉलीवूडच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातूनही या जोडीला शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर अक्षरशः वर्षाव झाला.