नवी दिल्ली : देशात केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याविषयी माहिती दिली आहे. मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच त्याच्या संपर्कात ११ जण आल्याचेदेखील पुढे आले आहे. सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
पीडित व्यक्ती काही दिवसांपूर्वी यूएईला गेली होती. तेथून आल्यानंतरच त्याच्या आत मंकीपॉक्सची लक्षणे दिसली. या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची नोंद करण्यात आली, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. त्याची चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात ११ जण आल्याचेदेखील पुढे आले आहे. सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.त्याचे वडील, आई, टॅक्सी ड्रायव्हर, ऑटो ड्रायव्हर आणि बाजूच्या सीटवरील 11 सहप्रवासी यांच्यासह त्याच्या जवळचे संपर्क देखील ओळखले गेले आहेत.
A Monkey Pox positive case is reported. He is a traveller from UAE. He reached the state on 12th July. He reached Trivandrum airport and all the steps are being taken as per the guidelines issued by WHO and ICMR: Kerala Health Minister Veena George pic.twitter.com/oufNR7usLN
— ANI (@ANI) July 14, 2022
मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असतात. हा रोग १९५८ मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स, असे नाव पडले. हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत.
साधारण २ ते ४ आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर १ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत आहे. तसेच मंकीपॉक्सचा इंक्यूबेशन काळ ( संसर्गापासून लक्षणांपर्यंतचा काळ ) साधारणतः ७ ते १४ दिवसांचा असतो. मात्र तो ५ ते २१ दिवसांपर्यंत वाढू शकतो, असे यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.