नगर (प्रतिनिधी) – करोनाबाधित रुग्णवाढीचा आज नगर जिल्ह्यात नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. नगरमध्ये आज 1 हजार 338 रुग्णांची भर पडली. आजची रुग्णवाढ नगरकरांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. तथापि, अजुनही नगरकर गर्दीवर नियंत्रण मिळवू शकले नसल्याचे भीषण चित्र रस्त्या-रस्त्यांवर दिसत आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चिंताजनकस्थितीत घसरले असल्याचे आज प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अहवालावरुन दिसते. जिल्ह्यात आज 660 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 82 हजार 096 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण खूपच घरसले असून, ते आता 93.20 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत 1 हजार 338 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 4 हजार 799 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 511, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 655 आणि अँटीजेन चाचणीत 172 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 194, अकोले 39, जामखेड 25, कोपरगाव 45, नगर ग्रामीण 24, नेवासा 08, पारनेर 20, पाथर्डी 10, राहता 34, राहुरी 03, संगमनेर 31, शेवगाव 47, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 14 आणि कँटोन्मेंट बोर्ड 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 223, अकोले 27, कर्जत 03, कोपरगाव 55, नगर ग्रामीण 22, नेवासा 05, पारनेर 12, पाथर्डी 01, राहाता 93, राहुरी 15, संगमनेर 116, शेवगाव 08, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 51, कॅन्टोन्मेंट 07 आणि इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 172 जण बाधित आढळुन आले. मनपा 40, अकोले 08, जामखेड 12, कर्जत 12, कोपरगाव 01, नगर ग्रामीण 05, नेवासा 11, पारनेर 14, पाथर्डी 19, राहाता 13, राहुरी 08, संगमनेर 01, शेवगाव 16, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 04, कॅन्टोन्मेंट 01, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा 238, अकोले 16, जामखेड 12, कर्जत 22, कोपर गाव 35, नगर ग्रामीण 26, नेवासा 31, पारनेर 19, पाथर्डी 31, राहाता 77, राहुरी 27, संगमनेर 57, शेवगाव 14, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 23, कॅन्टोन्मेंट 18 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.
करोना अपड्ेटस
बरे झालेली रुग्ण संख्या : 82096
उपचार सुरू असलेले रूग्ण : 4799
जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 1189
एकूण रूग्णसंख्या : 88084
संशयितांचा जीव टांगणीला..!
करोना विषाणूची बाधा झाल्याचा संशय असलेले अनेकजण सध्या स्वॅब देण्यासाठी करोना टेस्ट लॅबकडे धाव घेत आहेत. त्यातून जिल्हा शासकीय रुग्णालयासह अनेक ठिकाणी रुग्णांची प्रचंड गर्दी वाढत आहे. परिणामी स्वॅब घेणार्या यंत्रणेची देखील मोठीच तारंबळ उडत असून, ते वेळेत अहवाल देखील देऊ शकत नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. त्यात तुलनेने कमी लक्षणे असलेले रुग्ण स्वॅब देऊन पुन्हा शहरभर वावरत आहेत. परिणामी त्यात एखाद्यास करोना विषाणूची बाधा झाली असल्यास केवळ अहवालात विलंब झाल्याने तो रुग्ण पुन्हा रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचेही भीषण वास्तव आहे.
कडक लॉकडाऊनची मागणी ज्येेष्ठ नागरिक मंचतर्फे निवेदन
मागील वर्षी जिल्ह्यात याच महिन्यात अवघे 26 रुग्ण होते. तेव्हा लॉकडाऊन होता. सगळे व्यवहार बंद होते. आज याच दिवशी तब्बल मागील चोवीस तासांत तब्बल 1 हजार 326 नवे बाधित आढळले आहेत. रुग्णवाढीचा हाच वेग राहिल्यास आणखी काहीच दिवसांत नगरमधील सर्वजण करोनाबाधित आढळतील, अशी भीती व्यक्त करत नगर जिल्ह्यात अत्यंत तातडीने कडक लॉकडाऊन जाहीर करावे, अशी मागणी जागरुक नागरिक मंचतर्फे अध्यक्ष सुहास मुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुळे यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना मेलद्वारे निवेदन दिले आहे.