पुन्हा विक्रमी वाढ! गेल्या २४ तासांत दीड लाखांपेक्षा जास्त करोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : देसाहत कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशातील रुग्णवाढ नव्या शिखरावर पोहोचली आहे. देशात करोनाचा प्रवेश झाल्यापासूनचा सर्वाधिक आकडा आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही २४ तासांत वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली ही आकडेवारी सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ आणि मृत्यूची संख्या जाहीर केली आहे. रविवारी नोंदवण्यात आली रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. २४ तासांत १ लाख ६८ हजार ९१२ करोना बाधित आढळून आले असून, याच कालावधीत देशात ९०४ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ हजार ८६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्याही १ लाख ७० १७९ इतकी झाली असून, एकूण रुग्णसंख्या १,३५,२७,७१७ वर पोहोचली आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर करोनाची पहिली लाट ओसरली होती. फेब्रुवारीपर्यंत देशात दिवसाला १० हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. मात्र, करोनाचा अचानक उद्रेक झाल्यानंतर एका महिन्यातच देशात दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णसंख्या लाखांच्या घरात पोहोचली होती. एप्रिलमध्ये देशात दररोज एका लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मागील तीन दिवसांपासून देशात सलग दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णवाढ नोंदवली गेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.