नवी दिल्ली – बराक ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यांनी या पुस्तकात राजकीय प्रवासापासून ते खासगी गोष्टींपर्यंत अनेक गोष्टींवर ओबामा यांनी भाष्य केलं आहे. राजकीय पक्षांमधील कडवे वाद, विविध सशस्त्र फुटीरवादी चळवळी आणि भ्रष्टाचार घोटाळे असूनही आधुनिक भारताची कहाणी अनेक मुद्यावर या पुस्तकातून आपलं मत त्यांनी मांडले आहे. यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.
रामायण, महाभारत ऐकत बालपण गेले
सध्या या पुस्तकाची चर्चा सर्वत्र होत असून बाजारात येताच पहिल्या 24 तासात 8 लाख 90 हजार प्रतींची विक्री झाली आहे. आधुनिक काळात अध्यक्षपदाच्या अनुभववावर आधारित पुस्तकाला इतक्या मोठ्या प्रमाण पहिल्यांदा प्रतिसाद मिळाला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ‘पेंग्विन रँडम हाऊस’ या संस्थेने केले आहे. 8 लाख 90 हजार प्रतींमध्ये प्रत्यक्ष बुकिंग, ई-बुक, ऑडिओ बुक अशा प्रकारचा आवृत्तींचा समावेश आहे.
“ओबामांचं आता काही खरं नाही, शिवसेना नाराज झाल्याने त्यांना झोप लागत नसेल”
दरम्यान, या पुस्तकात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे तर ओबामा यांनी असा दावा केला आहे की 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर माजी भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. याच्यामुळे त्यांचे राजकीय नुकसान झाले. असं ही त्यांनी या पुस्तकात भाष्य केल आहे.