जुन्नर – तालुक्यातील निकाल हा रेकॉर्डब्रेक म्हणजे तब्बल 97.77 टक्के लागला आहे. जुन्नर तालुक्यातील 89 शाळांमधील 5400 या परीक्षेस बसले होते. त्यापैकी 5280 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती गटशिक्षण अधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी दिली आहे. तालुक्यातील 89 पैकी तब्बल 47 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
100 टक्के निकाल लागलेल्या शाळा : गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर (नारायणगाव), विद्या विकास मंदिर (राजुरी), सरदार पटेल हायस्कूल (अणे), अंजुमन हायस्कूल (जुन्नर), श्री श्री संभाजी विद्यालय (बोरी), श्री विघ्नहर विद्यालय (ओझर), शिवनेरी विद्यालय (धोलवड), आणे माळशेज हायस्कूल, मढ, पुष्पावती विद्यालय (डिंगोरे), सरस्वती विद्यालय (उदापूर), आश्रमशाळा खिरेश्वर, आश्रमशाळा अंजनावळे, अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम (नारायणगाव), न्यू इंग्लिश स्कूल (खामुंडी), सावळाराम बुवा दांगट विद्यालय (उंब्रज), इंदिरा गांधी हायस्कूल (बेल्हे), आश्रम शाळा सोनवणे गुरुवर्य गोविंददेव प्रशाला (बोरी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय (तांबे), न्यू इंग्लिश स्कूल (राजुर नं. 1), शारदाबाई पवार विद्यालय (आंबेगव्हाण),
श्री लेण्याद्री विद्यामंदिर (बल्लाळवाडी), ज्ञानदा माध्यमिक विद्यालय (मंगरूळ), सोमतवाडी आश्रमशाळा शितळेश्वर विद्यालय (सितेवाडी), समर्थ मधुकरराव विद्यालय (चिंचोली), कुलस्वामी श्री खंडेराय विद्यालय (हिवरे तर्फे नारायणगाव), कुलस्वामी विद्यामंदिर (वडज), अजितदादा पवार हायस्कूल (देवळे), ग्रामोन्नती मंडळ (गुंजाळवाडी), न्यू इंग्लिश स्कूल (नगदवाडी), न्यू इंग्लिश स्कूल (धामणखेल), न्यू इंग्लिश स्कूल (करंजाळे), न्यू इंग्लिश स्कूल (शिरोली बु.), ज्ञानदा माध्यमिक विद्यालय (गोद्रे), शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय (आळेफाटा), श्री जगदंबा विद्यालय (जाधववाडी), जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल (आळेफाटा), शेठ नेनसुख मुथा स्कुल (जुन्नर), ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल (जुन्नर), शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम (जुन्नर), कर्पदिकेश्वर इंग्लिश स्कूल (ओतूर), हांडे देशमुख हायटेक स्कूल (आळेफाटा), विद्या निकेतन हायस्कूल (साकोरी), रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूल (शिरोली), हिरा इंग्लिश मिडीयम (खानापूर) व आश्रमशाळा (खटकाळे).
तालुक्यातील प्रथम तीन मानकरी
ऋतुजा आमले : 99.60 टक्के (अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर, जुन्नर)
चैत्राली गायकर : 99.20 टक्के (चैतन्य विद्यालय, ओतूर)
वैष्णवी अमूप : 99 टक्के (सरस्वती विद्यालय, उदापूर)