विक्रमी १२% लाभांश मिळणार
जळोची(प्रतिनिधी)- बारामती शिक्षक को.ऑप. क्रेडिट सोसायटीला यावर्षी २ कोटी ३५ लाख रुपयांचा नफा झाल्याने विक्रमी बारा टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन गजानन गाढवे व व्हॉईस चेअरमन राजेंद्र होले यांनी दिली
बारामती शिक्षक क्रेडिट सोसायटी ही राज्यातील अग्रगण्य आर्थिक संस्था असून मागील चार वर्षांपासून या संस्थेची वार्षिक सभा जून महिन्यात घेण्यात येते,या वर्षी कोरोना आजारामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेस परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही, यावर्षी शिक्षक सोसायटीस विक्रमी २ कोटी पस्तीस लाख रुपयांचा नफा झाला आहे , त्यामुळे १२ टक्के दराने लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,
शिक्षकांचा अपघाती अथवा आजारपणामुळे मृत्यू झाल्यास २० लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे, अंशदायी पेंशन योजमधील शिक्षक मयत झाल्यास त्यांना २० लाखांच्या विम्यासोबत वाढीव १० लाख रुपये संस्थेकडून मदतनिधी देण्यात येणार आह, ३० लाखांच्या मदतीमुळे पेन्शनपासून वंचित असलेल्या नव्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.लाभांश वाटप वगळता सभासद हिताचे सर्व निर्णय तात्काळ लागू करण्यात येणार असल्याची माहिती तानाजी भोसले, देविदास ढोले व संचालक मंडळाने दिली.
कर्ज व्याजदरात कपात….
यावर्षी व्याजदरात पुन्हा कपात करून मोठे कर्ज नऊ टक्के व तातडीचे कर्ज आठ टक्के दराने वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ जुलै पासून नवीन व्याजदराचा लाभ सुरू करण्यात आला आहे
२० लाख कर्ज मर्यादा…
संस्थेने कर्जमर्यादेत वाढ केली असून शासन परिपत्रकानुसार शिक्षकांना पगाराप्रमाणे २० लाखापर्यंत वाढीव कर्ज मिळणार आहे