पुणे – बँक ऑफ इंडियाद्वारे येत्या 25 नोव्व्हेंबर ते 29 नोव्व्हेंबर पर्यंत समझोता आउटरीच दीनाचे आयोजन देशभरातील सर्व शाखांमध्ये, तसेच आंचलिक कार्यालय आणि क्षेत्र महाव्यवस्थापक कार्यालयामध्ये एकरकमी परतफेड योजनेंर्तगत थकीत (एनपीए) कर्जदाराच्या कर्ज खात्यांची परतफेड करण्यासाठी समझोता दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यवसायातील / वैद्यकीय स्थिती वा अन्य वैध कारणामुळे कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या कर्जदारांसाठी या समझोता दिवसाचे आयोजन करण्यात येते. बँक ऑफ इंडियामध्ये लहान किमतीची खाती आणि मध्यम आकाराची खाती सेटल करण्यासाठी विशेष ओटीएस योजना राबवण्यात आली आहे. ज्याद्वारे एनपीए असलेल्या कर्जदारांच्या खात्यांसाठी आकर्षक आणि चांगल्या सवलती दिल्या जातात. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त एनपीए खातेदारांनी घ्यावा, असे आवाहन पुणे झोनचे आंचलिक प्रबंधक संजय कदम यानी केले आहे.