कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राज्यातील कनिष्ठ डॉक्टरांच्या संपामुळे खोळंबलेली वैद्यकीय सेवा वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमधील वरिष्ठ डॉक्टर्स तथा प्राध्यापकांनी सुरळीत करावी अशी विनंती केली आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांनी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमधील वरिष्ठ डॉक्टर्स तथा प्राध्यापकांना एक विनंतीपत्र लिहलं असून या पत्राद्वारे त्या म्हणतात, “कृपया सर्व रुग्णांची काळजी घ्या. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून उपचारांसाठी रुग्ण येत आहेत. आपण जर रुग्णालयांची संपूर्ण जबाबदारी पेलली तर हे माझ्यासाठी अभिमानास्पद असेल. कृपया रुग्णालयांचे कामकाज सुरळीत करावे.”
तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी आज एसएसकेएम हॉस्पिटलला भेट देत संपावर असलेल्या डॉक्टरांना आज दुपारी २ वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा सुरळीत करा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा अल्टिमेटम दिला होता. मात्र ममता बॅनर्जी यांच्या अल्टिमेटमनंतर देखील येथील डॉक्टरांनी आपण आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
West Bengal CM writes to Senior Doctors/Professors of Medical Colleges & Hospitals, states, "Please take care of all patients, poor people are coming from all districts. I'll be obliged & honored if you all please take full care of hospitals. they must run smoothly & peacefully," pic.twitter.com/sSl9JwpDjY
— ANI (@ANI) June 13, 2019