“विठ्ठलनगर’ पुनर्वसन प्रकल्प समस्यांच्या विळख्यात

ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग; अनधिकृत दुकाने
पिंपरी – विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये सध्या कमालीची अस्वच्छता पाहण्यास मिळत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे. सांडपाणी वाहिन्यांमध्ये घाण, गाळ साचुन सांडपाणी रस्त्यावर वाहते. तसेच, प्रकल्पाच्या पार्किंगमध्येच काही विक्रेत्यांनी अनधिकृत दुकाने थाटली आहेत. त्याचा रहिवाशांना त्रास होत आहे.

विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात एकुण 13 इमारतींचे बांधकाम झालेले आहे. त्यातील एका इमारतीतील 101 सदनिका नाशिकफाटा येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांना दिलेल्या आहेत. 11 सदनिकांचे वाटप शिल्लक आहे. प्रकल्पातील 10 इमारतींचे वाटप झाले आहे. तर, 2 इमारतींचे वाटप बाकी आहे. वाटप बाकी असलेल्या एका इमारतीतील 80 लोकांनी स्वहिस्सा रक्कम भरली आहे. त्यांच्या सदनिकांची सोडत काढलेली आहे. तर, अद्याप 144 सदनिकांचे वाटप बाकी आहे.

दरम्यान, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली असता नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. येथील प्रकल्पातील पार्किंगमध्ये आणि इमारतीच्या पाठीमागे ठिकठिकाणी कचरा साचला होता. काही सोसायट्यांमध्ये पाण्याची टाकी नियमित साफ होत नाही. त्यामुळे नागरिकांना दुषित पाण्याची समस्या जाणवते. प्रकल्पाच्या पॅसेजमध्ये काही ठिकाणी फरशा तुटलेल्या आहेत. काही इमारतींच्या लिफ्ट चालु आहेत. तर, काही इमारतींच्या लिफ्ट बंद स्थितीत आहेत. येथील सांडपाणी नलिकेत घाण आणि गाळ साचतो. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येते. त्याच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास होत आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये काही विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याचे चित्र दिसले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.