खांडवी
साहित्य :चणाडाळीचे पीठ, ताक अडीच ते तीन वाटी, तिखट किंवा हिरवी मिरची, मीठ, हळद, कोथिंबीर, खोबरे, मोहरी, तेल.
कृती : पीठ आणि ताक एकत्र करुन त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट किंवा वाटलेली मिरची टाकून मंद आचेवर मिश्रण सतत ढवळत रहा. चमच्यावर पीठाचा दाट थर येऊ लागला किंवा थाळीवर पसरले तर मिश्रण थाळीपासून सुटू लागेल तेव्हा गॅसवरुन उतरवा. गरम असताना थाळीवर पातळ पसरवा. त्यावर फोडणी घालून खोबरे, कोथिंबीर घाला. गार झाल्यावर सर्व्ह करा.