#रेसिपी : अशी बनवा घरगुती पद्धतीने चिकन दम बिर्याणी

बिर्याणीसाठी
बिर्याणी मसाला -4 चमचे ,हळद -अर्धा टीस्पून , चिकन मसाला-1 टीस्पून , हिरव्या मिरच्या- 7/8 (आवडीनुसार) , कोथिम्बीर-एक कप , पुदीना-एक कप , आले+लसूण पेस्ट- 2 चमचे , टोमेटो-3 , कांदे -4 ते 5 मोठे

खडा गरम मसाला दालचिनी-२ लवंगा -4 , काळीमिरी -4 ते 5 , तेजपत्ता -3 ते 4 पाने , जिरे – अर्धा टीस्पून , शहाजिरे -अर्धा टीस्पून , चक्री फूल-2 , मसाला वेलची -2 , विलायची -4 , लिंबू – अर्धे कापुन, चविनूसार मीठ.( chicken biryani recipe in marathi )

कृती –
1) गावरान कोंबडीचे चिकन स्टॉक- (अळणी चिकन रस्सा)
प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. 3 मोठे कांदे उभे चिरावेत. एका मोठ्या पातेल्यात 4 पळ्या तेल गरम करत ठेवावे . मग त्यात खडा मसाला घालावा. थोडा परतला की कांदे घालावेत. कांदे जरासे फ्राय झाले की 2 टीस्पून आले लसूण पेस्ट घालावी. छान गोल्डन फ्राय करावे. मग दीड टीस्पून हळद घालावी. परतून त्यात धुतलेले चिकन घालावे. चमचा ते दीड चमचाभर मीठ घालावे . हलवून मध्यम आचेवर झाकून ठेवावे. एकीकडे 4 ते 5 ग्लास पाणी गरम करत ठेवावे.

चिकनला तोवर छान पाणी सुटलेले दिसेल. ते पाणी आटलेले थोडे दिसले की मग त्यात अवश्यकता अनुसार 3 4 ग्लास गरम पाणी घालावे व चिकन अर्ध्यापेक्षा जास्त शिजवून घ्यावे. पुर्ण शिजवू नये. छान स्टॉक तयार होइल. वरुन अर्धा कप कोथिंबीर चिरुन त्यावर घालुन मग गैसवरुन उतरवून घ्यावे.
( chicken biryani recipe in marathi )

आता त्यात 2 चमचे मिरची पेस्ट घालावी.छान फ्राय झाली की हळद घालावी. छान परतून कोथिंबीर +पुदीना वाटण घालावे. 5 मिनिट छान फ्राय होऊ द्यावे. मग चिरलेले टोमॅटो घालावे. बिर्याणीचा मसाला घालावा. मीठ घालावे. अजुन 5 ते 7 मिनिट परतुन घ्यावे.
आता त्यात अर्धे चिकन घालावे..(साधारणतः 1 किलो)

5 मिनिट छान परतून घ्यावे. मग तांदूळ घालुन हलकेच परतून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी घालुन हलवावे. अर्धे लिंबू पिळावे. पुन्हा एकदा छान हलवावे. 2 चमचे साजूक तूप घालावे. कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ द्याव्यात व गैस बंद करावा. कुकरची वाफ पुर्ण गेली की कुकर उघडून त्यावर चिरलेली कोथिम्बीर,पुदीना पसरवा. तसेच उभा कापुन क्रिस्पी तळून घेतलेला कुरकुरीत कान्दा ही पसरवू शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.