#रेसिपी : यंदाचा प्रजासत्ताक दिन तिरंगा ढोकळ्यासह सेलिब्रेट करा

महत्त्वाची सामग्री

1 कप रवा
1 कप योगर्ट
11/2 चमचे साखर
1 चमचे कोथिंबीरीची पाने
1 कप शेंगदाणा तेल
आवश्यकतेनुसार कढीपत्ता
आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या
पालक प्यूरी – 1 कप
नारंगी  खाण्याच्या रंग – 1 छोटा चम्मच
आवश्यकतेनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
1 चमचे मोहरीच्या बिया
2 pieces लसूण
आवश्यकतेनुसार बेकिंग सोडा

साहित्य

  • बाउलमध्ये एक कप रवा, एक कप आंबट दही, साखर, चवीनुसार मीठ एकत्र घ्या आणि सर्व सामग्री नीट मिक्स करा. यानंतर मिश्रणात बारीक चिरलेले दोन लसूण आणि थोडे पाणी देखील घाला. ढोकळ्याचे पीठ मऊ होईपर्यंत सर्व सामग्री ढवळत राहा.

 

आता पुढे, तेल लावलेल्या प्लेटमध्ये ढोकळ्याचं पीठ ओता आणि पाणी उकळत असलेल्या पॅनवर प्लेट ठेवा. प्लेटवर झाकण ठेवावे. १५ मिनिटे मिश्रण शिजू द्यावे. यातील थोड्या पिठामध्ये पालक प्यूरी  मिक्स करून त्याची लेयर ढोकळा करतांना खालच्या बाजूस टाकावी तर नारंगी  रंग मिक्स केलेले मिश्रण खालच्या बाजूस टाकावे    दुसऱ्या पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा. त्यात एक चमचा मोहरी, कढीपत्ता आणि चिरलेली हिरवी मिरची फ्राय करा.   शिजलेल्या ढोकळ्यावर ही फोडणी सोडावी आणि ढोकळा सर्व्ह करावा. चिंचेची चटणी किंवा चहा/ कॉफीसोबत तुम्ही रवा ढोकळ्याचा आस्वाद घेऊ शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.