बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेत्री अनन्या पांडेची बरीच चर्चा दिसून येते. ती अत्यंत वेगाने सिनेसृष्टीत आपला जम बसवत आहे. चाहत्यांच्या तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि अनन्याही त्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे.
View this post on Instagram
kaali peeli but feeling a rainbow of emotions ??❤️ #FilmfareAwards2020 #BestDebut #Grateful #Blessed
अलीकडेच पार पडलेल्या 65 व्या फिल्मफेअर ऍवार्डस् कार्यक्रमामध्ये अनन्याला स्टुडंट ऑफ द ईअर 2 साठी बेस्ट डेब्यू ऍक्टर अर्थात सर्वोत्कृष्ट नवोदित नायिका म्हणून पुरस्कार देण्यात आला.
फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर अनन्याने सर्वांत आधी निर्माता आणि या शोचा होस्ट करण जोहर याला आलिंगन दिले. त्यानंतर तिने आपले वडील चंकी पांडे यांना ही गुड न्यूज कळवली. अर्थातच मुलीला फिल्मफेअर मिळाल्याचे ऐकून चंकी पांडे भावुक झाले. अनन्या सांगते, या कार्यक्रमाला वडिलांची उपस्थिती खूप गरजेची होती.
मला हातामध्ये ट्रॉफी घेऊन या स्टेजवर त्यांनी पाहायला हवं होतं. माझ्या वडिलांना कधीच फिल्मफेअर मिळाला नाही. त्यामुळे माझा विजय ही त्यांच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. ते काही कारणास्तव येथे येऊ शकले नाहीत; पण मी त्यांना सर्वांत जास्त मिस केलं…’ असं ती सांगते. फिल्मफेअर पुरस्कार मिळवणं हे हिंदी सिनेसृष्टीत आलेल्या प्रत्येकाचंच स्वप्न असतं. चंकी कन्येचं ते पूर्ण झालं याचा तिला आणि चंकी पांडे यांना झालेला आनंद अवर्णनीयच आहे.