पुणे – पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरीत कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा 12-10 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत अंतिम फेरीत कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा 12-10 असा संघर्षपूर्ण पराभव केला.
टेबल टेनिस प्रकारात एक्सकॅलिबर्स संघाने कुकरीज संघाचा असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या टेनिस प्रकारात कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा 4-3 असा पराभव सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. निर्णायक लढतीत बॅडमिंटन प्रकारात कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा 5-2 असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
कुकरीजकडून अनिश राणे, तेजस चितळे, अतुल बिनीवाले, तन्मय चोभे, अमोद प्रधान, केदार नाडगोंडे, देवेंद्र राठी, प्रांजली नाडगोंडे, क्षितिज कोतवाल, निखिल चितळे यांनी अफलातून कामगिरी बजावली.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व विविध पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे, रिबाऊंड स्पोर्टस्चे संचालक आलोक तेलंग, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, लर्न पंकेट लॅंग्वेज अकादमीच्या ईशा श्रोत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विनायक द्रविड, तुषार नगरकर, सारंग लागू, तन्मय आगाशे मान्यवर उपस्थित होते. सिद्धार्थ निवसरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सारंग लागू यांनी उपस्थितांचे आभार मानले.