बगदाद (इराक) : इराक आनि सिरीयामध्ये रविवारी अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराकी शित्ते मिलिशियाचे शेकडो समर्थक येथील अमेरिकन दुतावासात मंगळवारी घुसले. संतप्त निदर्शकांनी दुतावासाचे दारत तोडून संश्थेच्या आवारावर ताबा मिळवला.
या जमावाला पांगवण्यसाठी अमेरिकन सुरक्षा रक्षकांनी हात बॉम्बचा वापर केला असे वृत्त रॉयटर या वृत्त संस्थेने दिले आहे. तत्पुर्वी शेकडो निदर्शक अमेरिकन दुतावासाच्या आवारात शिरले. त्यांनी दार फोडून संस्थेच्या आवारात प्रवेश केला. त्यांनी स्वागत कक्ष पेटवला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याच्या आणि गोळीबार केल्याचा आवाज येत होता,असेही रॉयटरने म्हटले आहे.
दुतावासाच्या पार्किंगमधून आगीचे लोट दिसत होते. मात्र त्यात किती नुकसान झाले याचा तपशील समजू शकला नाही. संस्थेच्या आवारात प्रवेश करू नका असे एक माणूस ओरडत होता. त्याने शेवटी आम्ही संदेश दिला आहे, असेही म्हटले. दुतावासावर केलेला हा अलीकडच्या काळातील सर्वात भीषण हल्ला होता.