पिंपळवंडी : जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील बंड शमवल्याचे बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्याने सत्यशील शेरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
त्यातच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेत आज सत्यशील शेरकर यांच्या प्रचारात ते सहभागी झाले आहे. त्यामुळे महाविकास आघडीला मोठा दिलासा मिळाला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचा आळे – पिंपळवंडी जिल्हा परिषद गटाचा प्रचार दौऱ्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण ताकदीने सहभागी झाल्याचे दिसून आले.
मतदारसंघात महायुतीत बेबनाव दिसून येत असून अनेक उमेदवार रिंगणात आहे मात्र महाविकास आघाडी एकसंघपणे काम करणार असून आता आमच्यात कसलेही मतभेद नसल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी सांगितले तसेच यावेळी सर्वच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहणार असून सत्यशील शेरकर यांना विधानसभेत पाठवणार असल्याचे सांगितले.
यावेळी शरदराव लेंडे, अनंतराव चौगुले, तुषार थोरात, मोहीतशेठ ढमाले , मंगेश आणा काकडे, बाबाशेठ परदेशी, युवराज बाणखेले, शिवाजीराव काकडे , शाम माळी, अशोक सोनवणे, तोतरे भाऊसाहेब, पिराशेठ टाकळकर, शिवाजीराव चाळक, अर्चनाताई भुजबळ, बाळासाहेब काळजे, दादाभाऊ काळजे, संदीप लेंडे, बाबु कदम ,गणेश लेंडे, वैभव कालेकर, विजय कालेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थीती होती.