अकालीदलात बंड : बंडखोर गटाने खासदार धिंडसांना केले अध्यक्ष

लुधियाना: पंजाबातील अकाली दलात बंड झाले आहे. त्या पक्षातील एका बंडखोर गटाने पक्षाच्या अध्यक्षपदी राज्यसभेचे खासदार सुखदेवसिंग धिंडसा यांना पक्षाचे अध्यक्ष करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

तथापि, ही निवड बेकायदेशीर आणि भ्रष्ट स्वरूपाची असल्याची टीका अकालीदलाने केली आहे. सध्या सुखबीरसिंग बादल हे अकालीदलाचे अध्यक्ष आहेत. सुखदेव सिंग धिंडसा आणि त्यांचे पुत्र व पंजाबचे माजी मंत्री परमिंदरसिंग धिंडसा या दोघांना फेब्रवारी महिन्यात अकालीदलातून बडतर्फ करण्यात आले आहे.

धिंडसा यांनी अकालीदलाच्या बंडखोर गटाशी हातमिळवणी केली. त्यात त्यांना अकालीदलाच्या टाकसाळी गटाचीही साथ मिळाली. धिंडसा हे आता अकाली दलाचे अध्यक्ष झाल्याने ते पक्षाच्या अमृतसर येथील मुख्यालयातूनच काम पहातील अशी माहिती माजी खासदार परमिंदर कौर गुलशन यांनी दिली.

त्यांनीच पक्षाध्यक्षपदासाठी धिंडसा यांचे नाव घोषित केले व त्याला हरजित कौर तलवंडी यांनी अनुमोदन दिले. हरजित कौर या अकालीदलाचे दिवंगत अध्यक्ष जगदेवसिंग तलवंडी यांच्या कन्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.