मुंबई – करोनाच्या धास्तीमध्ये सर्वसामान्यांना तेल कंपन्यांनी खुशखबर दिली आहे. सबसिडी नसणाऱ्या एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी कपात केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सबसिडी नसणाऱ्या एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या १४.२ किलोचे १४.२ किलोचे सबसिडी नसणाऱ्या एएनपीजी सिलेंडरच्या किंमती मुंबईमध्ये ६२ रुपयांनी कमी होत ७१४ रुपयांवर पोहोचल्या आहेत. नॅचरल गॅसच्या किंमतीमध्ये कपात केल्यामुळे सीएनजी, पाईपलाइनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचणारा गॅस यांच्या सुद्धा किंमती कमी होतील.
Price of LPG cylinders is at Rs 744.00 (decrease by Rs. 61.50) in Delhi and at Rs. 714.50 (decrease by Rs. 62) in Mumbai, today: Indian Oil Corporation pic.twitter.com/s2yAniC25D
— ANI (@ANI) April 1, 2020
दरम्यान, सरकारने ३१ मार्च रोजी देशामधील उत्पादित नॅचरल गॅस (Natural Gas) च्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या किंमतीमध्ये २६ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.