करोना महासाथीमुळे महाराष्ट्राची परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेने काहीशी चिंताजनक असल्याने राज्य सरकारवर प्रचंड ताण आहे. अशात राज्याचे उद्धव ठाकरे हे एक खंबीर आणि आश्वासक नेते म्हणून यशस्वीपणे पुढे आले आहेत. करोनाचे संकट हे त्यांच्या नेतृत्व कौशल्याला वाव देत आहे. आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर उद्धवजी ठाकरे साहेब लोकांसह विरोधकांचीही मने जिंकत आहेत.
करोनाच्या काळात त्यांनी गरीब व सर्वसाधरण लोकांसाठी शिवभोजन थाळी, महात्मा फुले जन आरोग्य सुविधा, परप्रांतियांना परत आपल्या घरी जाण्यासाठी केलेली मदत यामुळे त्यांची लोप्रतियता जागतिक स्तरावर नावाजली जात आहे. तर आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून करोनावर नियंत्रण ठेवता येत हे जगाला दाखवून दिले.
त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून करोनाला रोखण्यासाठी प्रशासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या धारावी मॉडेलची दखल घेत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कौशल्याचेही कौतुक केले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशातील एकमेव करोना योद्धा ठरलेल्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
भास्करशेठ गाडगे- अध्यक्ष, ग्रामविकास मंडळ, निमगाव सावा, ता. जुन्नर