लहान मुलांबाबत दिलासा देणारा निष्कर्ष

लंडन – लहान मुलांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर ते पाच ते सहा दिवसात बरे होतात. मात्र काही मुलांमध्ये करोनाची लक्षणे चार आठवडे िंकवा त्यापेक्षा जास्त काळ दिसण्याची शक्‍यता असते मात्र असे होणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. असे लॅन्सेट चाईल्ड अँड ऍडोलसंट हेल्थ नियतकालिकाने म्हटले आहे.

स्मार्टफोन ऍपच्या माध्यमातून पालक आणि मुलांची काळजी घेणारे लोक यांनी दिलेल्या माहितीनुसार हा संशोधन निबंध तयार करण्यात आला आहे. शाळकरी वयातील मुलांमध्ये करोनाची लक्षणे कशा प्रकारे व किती काळ दिसतात याबाबतचा हा पहिलाच सविस्तर अभ्यास आहे.

किंग्ज कॉलेज, लंडन या संस्थेच्या प्राध्यापक एम्मा डंकन यांनी म्हटले आहे, की करोनाची लक्षणे जास्त काळ दिसलेल्या मुलांची संख्या कमी आहे. फार कमी मुलांमध्ये हा आजार जास्त काळ लक्षणे दाखवतो. मुलांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अनुभव यातून हे स्पष्ट होत आहे. काही मुलांमध्ये करोनाची लक्षणे जास्त काळ म्हणजे चार आठवड्यांपर्यंत दिसली. पण लक्षणांचा हा कालावधी जास्त असण्याची शक्‍यता कमी असते.

दरम्यान, करोना झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता वाढते असेही लॅन्सेटने आपल्या अभ्यासात नमूद केले आहे. त्यांनी यासंदर्भातील आकडेवारीचाही आधार घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.