नवी दिल्ली – आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून केला जातोय, मोबाईल फोन हे त्यापैकीच एक… आज हे साधन प्रत्येकाची गरज बनलं आहे. दरम्यान, तुम्ही सुद्धा नवीन मोबाइल घेण्याच्या विचारात असाल तर खालील बातमी नक्की वाचा…
नुकतंच रियलमी (Realme) कंपनीने आपला नवीन दमदार ‘Realme C15′ हा स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये लाँच केला आहे. Realme C15 ची खासियत म्हणजे या फोनची बॅटरी 6,000mAh असून 18W वेगवान चार्जिंगचा सपोर्ट आहे. तसेच, हा फोन भारतात लाँच केला जाईल की नाही हे सध्या तरी स्पष्ट झालेलं नाही.
Realme C15 ची दमदार वैशिष्ट्य –
तुम्हाला Realme C15 फोन मरीन ब्लू आणि सिगल सिल्व्हर अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. फोन ला 420 nits ब्राइटनेससह ६.५ इंच मिनी-ड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, उत्तम फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 13MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड एंगल कॅमेरा, 2MP ब्लॅक अँड व्हाइट सेन्सर आणि 2MP कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा दिला आहे.
Realme C15 च्या 3GB + 64GB व्हेरिएंटची किंमत आयडीआर १,९९९,००० (सुमारे १०,३०० रुपये), 4GB + 64GB व्हेरिएंटची आयडीआर २,१९९,००० (सुमारे ११,३०० रुपये) आणि 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत आयडीआर २,४९९,००० (सुमारे १२,८०० रुपये) ठेवण्यात आली आहे.