Realme C53 : स्पेशल सेलमध्ये 108MP कॅमेरा असलेला मोबाईल 9,999 रुपयांना मिळणार, ऑफर आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

स्मार्टफोन ब्रँड Realme ने गेल्या आठवड्यात भारतात कमी किंमतीतील परवडणारा फोन Realme C53 लॉन्च केला आहे. हा फोन 6 GB रॅम सह 128 GB स्टोरेज मध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये आहे. पण आज हा फोन एका खास सेल अंतर्गत उपलब्ध करून दिला जात आहे. विशेष सेलमध्ये, Realme C53 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. Realme C53 Champion Gold आणि Champion Black कलर पर्यायांमध्ये येतो.
Realme C53 स्पेशल सेल –
Realme चा नवीन फोन Realme C53 आज (24 जुलै) Flipkart वर विशेष सेल सुरू आहे. या सेलदरम्यान, फोनचा 6GB रॅम व्हेरिएंट 1,000 रुपयांच्या सवलतीनंतर 9,999 रुपयांना उपलब्ध होईल, तर 4GB रॅम व्हेरिएंट त्याच्या मूळ किंमत 9,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. म्हणजेच 11 हजारांचा फोन 10 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतो. Realme C53 चा पहिला सेल 26 जुलै रोजी दुपारी 12:00 वाजता Realme e-store, Flipkart आणि मेनलाइन चॅनेलवर लाइव्ह होणार आहे.
Realme C53 चे स्पेसिफिकेशन –
Realme C53 मध्ये 6.74-इंचाचा HD Plus IPS LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश, 560nits ब्राइटनेस आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. फोनमध्ये Octa Core Unisoc T612 प्रोसेसरसह 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB स्टोरेजसाठी सपोर्ट आहे. रॅम 12GB पर्यंत वाढवता येते.
Realme C53 मध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा दुय्यम सेन्सर आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. फोनसोबत मिनी कॅप्सूल फीचर देखील आहे. Realme C53 मध्ये 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.





