मनवाच्या मालिकेतल्या वाढदिवसाची तयारी केली रिअल लाईफ सिद्धार्थने

मराठी मालिका आणि त्यात होणारे वाढदिवस सण, लग्न यांची तयारी ही खूप जोरदार असते. प्रत्येक गोष्ट ही रिअल लाईफ मध्ये कशी दिसेल तशीच आपलया वाहिनीवर सुद्धा दिसले पाहिजे, आपल्या प्रेक्षकांनी त्याची चर्चा केली पाहिजे याची काळजी नेहमीच टीव्ही वाहिनी घेत असते. सध्या झी युवा वाहिनी वरील ‘तू अशी जवळी राहा’ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ७:३० वाजता प्रेक्षकांचे नित्यनेमाने मनोरंजन करते. तू अशी जवळी रहा मधील राजवीर हा असाच एक उत्तम नवरा आहे. ज्याचं त्याची बायको मनवा हिच्यावर अफाट प्रेम आहे. एक अतिशय नावाजलेलं आणि आत्मविश्वासी व्यक्तिमत्व जेव्हा एका साधारण मुलीवर प्रेम करू लागतो तेव्हा तो नक्की कसा वागेल याची खरं तर कोणीच खात्री देऊ शकत नाही. तू अशी जवळी राहा या मालिकेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांनी राजवीर आणि मनवाला भरपूर प्रेम दिले.

मालिकेत राजवीरची भूमिका सिद्धार्थ बोडके तर मनवाची भूमिका तितिक्षा तावडे करत आहे. तर झालं असं की मालिकेमध्ये मनवाचा वाढदिवस साजरा करायचा होता. आणि त्यासाठी तयारी सुद्धा झाली. मात्र सिद्धार्थला ती तयारी आवडली नाही, त्याच म्हणणं होत राजवीर मनवा वर एवढं वेड्यासारखं प्रेम करतो की तो तिच्यासाठी काहीही करू शकतो. त्यामुळे सिद्दार्थने एक विशेष लिस्ट प्रोडक्शन ला दिली, त्यामध्ये गुलाबाची फुले, त्याचबरोबर संपूर्ण रूमला लाईट, हार्ट शेप चे लाल रंगाचे फुगे आणि तिचा आवडीचा चॉकलेट केक या आलेल्या सर्व गोष्टींनी त्यानेच मनवाच्या वाढिदवसाची संपूर्ण तयारी केली आणि तिला सरप्राईझ केले.

Leave A Reply

Your email address will not be published.