शहरात असा असणार पोलीस बंदोबस्त
नगर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयडीसीतील वखार महामंडळातील गोदामामध्ये होणार आहे. यासाठी पोलीस उपअधीक्षक-1, पोलीस निरीक्षक-3, सहाय्यक पोलीस निरीक्षक-6, पोलीस उपनिरीक्षक -12, एसआरपी, एसएसबी च्या एक-एक तुकड्या, तसेच पेट्रोलींग साठी 20 पथके तर मतदार संघातील कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्मण होईल अशा ठिकाणी फिक्स पॉईंट पोलीस प्रशासनाने तयार केले असून त्याठीकांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नगर – जिल्ह्यातील बाराही मतदार संघातील मतदान प्रक्रिया चोख पोलीस बंदोबस्तामुळे शांततेत पार पडली. त्यापाठोपाठ मतमोजणी तालुक्यात एकाच वेळी होत आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधिकारी व कर्मचारी, सशस्त्र दलाचे जवान असा अडीच हजार जणांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्र व केंद्राबाहेर तैणात करण्यात आला आहे. तसेच उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
विधानसभा निवडणुक काळात आदर्श आचारसंहितेची कडक अमल बजावणी करण्यात आली. कर्जत-जामखेड मतदार संघ वगळता सर्वत्रच शांततेत मतदान पार पडले. त्यासाठी सात हजार पोलीस कर्मचारी, सशस्त्र दलाच्या जवानांचा बंदोबस्त होता. आता गुरुवारी (दि.24) रोजी होणारी मतमोजणी शांतेत पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. बाराही विधानसभा मतदारसंघांत तालुक्याचे ठिकाणी मतमोजणी ठेवण्यात आलेल्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
त्यामध्ये मतमोजणी केंद्रात आतील बाजूस व केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील इतर भागात पोलिसांची गस्त राहणार आहे. जिल्ह्याभरात 1 हजार 380 पोलीस कर्मचारी, 250 होमगार्ड, 150 शिघ्र कृती दलाचे कर्मचारी, सीमा सुरक्षा दलाच्या चार तुकड्या, राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या बंदोबस्ताला नेमण्यात आल्या आहेत.
त्याच बरोबर 9 पोलीस उपअधीक्षक, 29 पोलीस निरीक्षक, 67 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक असा बंदोबस्त असणार आहेत. एका मतमोजणी केंद्रावर एक पोलीस निरीक्षक, सहा उपनिरीक्षक, शंभर कर्मचारी व सीमा सुरक्षा दलाचे तीस जवान व राज्य राखीव दलाचे वीस जवान असा बंदोबस्त आहे.