एकविसाव्या शतकातील नव्या दशकात आपण नुकताच प्रवेश केला. 2020 या वर्षात सिनेजगतातही अनेक रंजक घडामोडी घडणार आहेत. या क्षेत्रातही सध्या इंटरनेट तंत्रज्ञानाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम यांसारख्या नव्या माध्यमांवरील वेबसीरिज नामक काल-परवा उदयाला आलेल्या नव्या व्यासपीठामुळे वाहिन्यांवरील मालिकांबरोबरच सिनेमागृहातील चित्रपटसंस्कृतीवरही संक्रांत येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण त्याचा एक फायदा म्हणजे या वेबसिरीजमधून नवोदितांबरोबरच जुन्या, लाईमलाईटपासून बाजूला गेलेल्या कलाकारांना पुन्हा एकदा प्रकाशात येण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार सध्या डिजिटल डेब्यूसाठी आतुर झालेले दिसतात. “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सारख्या विक्रमी चित्रपटांची नायिका आणि मिसेस अजय देवगण काजोलही सध्या यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती अजयसोबतच डिजिटल डेब्यू करणार आहे.
View this post on Instagram
Sometimes it’s ok to let your eyes do the talking and give your mouth some rest?
अजय देवगणच्या “त्रिभंगा’ नामक आगामी वेबफिल्ममध्ये काजोल झळकणार आहे. या वेबफिल्मची निर्मिती अजय करत असला तरी तो त्यामध्ये काम करणार नाहीये. या चित्रपटाविषयी काजोल सांगते की, तीन वेगवेगळ्या पिढ्यांमधील तीन महिलांवर आधारित असणारे या चित्रपटाचे कथानक आहे. मला ते खूप आवडल्यामुळे मी लगेचच होकार दिला. डिजिटल मीडिया ही आजच्या काळाची गरज आहे. आम्हा कलाकारांच्या दृष्टीनेपाहिल्यास हा संधींचा काळ आहे, असे काजोल सांगते.