वाघोली : व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी वाचनाचा छंद उपयुक्त असल्याचे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले.
वाघोली तालुका हवेली येथील ‘रोहन अभिलाषा’ गृहनिर्माण प्रकल्पामधील नूतन वाचनालयाचे (लायब्ररी) उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या प्रसंगी पवार बोलत होते.
यावेळी आमदार पवार यांनी सांगितले की, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि वाचनास प्रोत्साहन देण्यासाठी वाचनालय मोलाची कामगिरी करत आहे.
याप्रसंगी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन राजेन्द्र परभाणे, पुणे शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील (गवळी), पुणे शहर राष्ट्रवादी शीख समुदाय सेलचे अध्यक्ष गुरमितसिंग गिल, योगेश सुर्यवंशी यांसह अनेक मान्यवर आणि सोसायटी सभासद उपस्थित होते.