प्रभातवर वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
पिंपरी – राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह वकील, डॉक्टर, अभियंता यांनी लावलेली हजेरी, गुलाबी थंडीत मसाला दुधाची चव चाखत “प्रभात’वर प्रेम करणाऱ्या वाचकांचा रंगलेला स्नेहमेळा आणि गप्पांची मैफल बुधवारी (दि. 1) अनुभवण्यास मिळाली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या प्रांगणात शुभेच्छांच्या वर्षावात प्रभातचा 89 वर्धापन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला.
या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रभातवर प्रेम करणारे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, शिक्षण मंडळाच्या सभापती मनीषा पवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, नगरसेवक नामदेव ढाके, कामगार नेते यशवंत भोसले, नगरसेवक पंकज भालेकर, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, पौर्णिमा सोनवणे, झामाबाई बारणे, अश्विनी चिंचवडे, नगरसेवक केशव घोळवे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, सुलक्षणा धर यांच्यासह सिद्धेश्वर बारणे, शांताराम भालेकर, गजानन चिंचवडे, ऊर्मिला काळभोर, वाहिदा शेख, भारती चकवे, सतीश काळे, शिवाजी पवार, बाळासाहेब जाधव, आनंदा यादव, धम्मराज साळवे, रफीक कुरेशी, गंगाशेठ होनयव, राजु सावळे, संदेश नवले, गौतम डोळस, मयुर जैस्वाल, मकरध्वज यादव, तुषार पाटील, विशाल कसबे, अक्षय शहरकर, सचिन कळकुंभे, प्रथमेश झोरे, हलमलिंग मारमनी, व्यंकटेश मारमटू, दगडु आखले, वैभवी घोडके, गोरख पाटील, नंदु भोगले, प्रकाश जावळेकर, अप्पा सोनवणे आदींसह अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. पोलीस व प्रशासकीय क्षेत्रातील संदीप बिष्णोई, रामनाथ पोकळे, प्रमोद यादव, राजाराम पाटील, आनंद पाटील, नीलिमा जाधव, प्रभाकर वसईकर, डॉ. पवन साळवे, संतोष माने, दिलीप गावडे, सुधीर अस्पत, भीमराव शिंगाडे, डॉ. विवेक मुगळीकर, राजेंद्र कुंटे, शंकर अवताडे, विश्वजीत खुळे, ज्ञानदेव जुंधारे, विजय भोजने, अण्णा बोदडे, शिरीष पोरेडी, प्रमोद ओंबासे, सुहास पोतदार व इतरांनी हजेरी लावली.