मुंबई: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला. शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे. तसेच पवारांना 50 वर्ष राजकारणात असूनही दहाच्या वर खासदार निवडून आणता आले नाहीत, अशी टीका देखील पाटलांनी केली.
चंद्रकांत पाटील यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली. त्यानंतर शरद पवारांनी शरद पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शरद पवार एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांना आपले म्हणणे कसे काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे’
त्यानंतर शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला उत्तर दिल आहे. ‘दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी माझ्या वाचनात आले , खरं खोटं माहित नाही. चंद्रकांत पाटील यांना घरोघरी चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला. त्यामुळे अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार’, अशी खोचक टीका पवारांनी केली.