मिल्खा सिंग यांना आयुष्यभर राहिलेली ‘खंत’ आणि त्यांचा ४० वर्ष ‘न मोडता आलेला विक्रम’…काय आहे या मागची कहाणी वाचा

मुंबई : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी या महान खेळाडूने मृत्यूशी निकाराने झुंज दिली, मात्र ही झुंज अखेर अपयशी ठरली. दरम्यान,  मिल्खा सिंग यांचे विक्रम मोडण्यासाठी इतर खेळाडूंना वर्षानुवर्षे लागले आहेत.  रोमममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांचे कांस्य पदक अगदी थोडक्यात हुकले. त्यावेळी संपूर्ण देशानं पाहिलेलं एक स्वप्न भंग झाले होते. या पराभवानंतरही मिल्खा सिंग यांचा रेकॉर्ड तब्बल 40 वर्ष कायम होता.

मिल्खा सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 75 स्पर्धांचे विजेतेपद पटकावले. मात्र रोम ऑलिम्पिकमधील पराभवाबद्दल त्यांची नेहमी चर्चा झाली. रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर शर्यत मिल्खा सिंह यांनी 45.6 सेकंदामध्ये पूर्ण केली. त्यावेळी सेकंदामधील काही फरकाने  त्यांचे कांस्यपदक हुकले होते. मात्र या पराभवानंतरही मिल्खा यांनी नॅशनल रेकॉर्ड केला. हा रेकॉर्ड तब्बल 40 वर्ष कायम होता.

मिल्खा यांनी या स्पर्धेत पदक न मिळण्याचे कारण एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. ते म्हणाले, माझी सवय होती, की प्रत्येक शर्यतीवेळी मी एकदा मागे वळून पाहायचो. ऑलिम्पिक स्पर्धेत शर्यत खूप जवळ होती आणि मी जबरदस्त सुरुवात केली. मात्र, यात मी एकदा मागे वळून पाहिलं आणि कदाचित ही चूक मला महागात पडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.