रसातळाला गेलेला व्यवसाय पुन्हा उभारणाऱ्या ‘या’ महिलेची प्रेरणादायी कहाणी एकदा वाचाच

Business Motivation – जेंव्हा तुम्ही सर्वकाही मोठ्या मेहनतीने कमवता आणि एका झटक्यात कोणतीतरी ते सर्व चोरी करून घेऊन जातो तेंव्हा खूप वाईट वाटते. पण आपण मनुष्य आहोत साहेब, हार माननं हे आपल्या रक्तात नाही. आज आम्ही आपल्या समोर एक अशी खरी कहानी घेऊन आलो आहेत ज्यात हार माननं मान्य नाही.

एका वृत्तानुसार, तमिळनाडूतील रहिवासी Elavarasi Jayakanath सध्या केरळातली थ्रिसूर मध्ये राहतात. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे कुटुंब 45 वर्षापुर्वी मदुराईहून थ्रिसूर येथे स्थलांतरीत झाले होते. त्यांची इथपर्यंत पोहोचण्याची कहाणी खूप प्रेरणादायी आणि संघर्षमयी आहे.

मिठाई चा होता बिजनेस –

त्यांच्या कुटुंबाचा येथे मिठाईचा व्यवसाय होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर Elavarasi यांचे लग्न झाले आणि त्यांनीही आपल्या कुटुंबाच्या वाटेवर चालणे सुरू ठेवले. त्यांनीही मिठाईचे काम करणे सुरू केले. त्यांनी आपल्या कुटुंबियांकडूनच हे सर्व पदार्थ बनवणे शिकले आणि ते लोकल स्टोअर्स मध्ये विकणेही सुरू केले.

2011 मध्ये झाली होती चोरी –

द बेटर इंडियाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या परिवाराकडून माहिती घेऊन एका ठिकाणाहून 50 लाख रूपयाचे लोन घेतले. त्यांनी 2010 मध्ये एक सुपरमार्केट चे स्टोअर सुरू केले. तब्बल 50 लोक त्यांच्याकडे काम करत होते. मात्र, 2011 मध्ये त्यांच्या दुकाणात चोरी झाली. सर्वकही संपूष्टात आले.

पुन्हा 100 रूपयात सुरू केला बिजनेस –

चोरीची घटना घडल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वत:ला आणि आपल्या बिजनेसला पुन्हा उभे केले. Aswathi Hot Chips नावाने त्यांनी पुन्हा बिजनेस सुरू केला. हा बिजनेस त्यांनी केवळ 100 रूपयाने सुरू केला होता. आज थ्रिसूर मध्ये त्यांचे चार आऊटलेट आहेत. येथे वेगवेगळ्या प्रकराचे चिप्स, आचार, आणि केक मिळतो. 2019 मध्ये त्यांच्या याच मेहनत आणि चिकाटीला पाहून त्यांना International Peace Council UAE Award ‘Best Enterpreneur’ पुरस्कार मिळाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.